नगरसेवकांनी जनतेचा विश्वास सार्थ करावा -मा.आ.भीमराव धोंडे

आष्टीच्या नवनियुक्त भाजपा नगरसेवकांचा मा.आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न

बीड : आष्टी, पाटोदा व शिरूर नगर पंचायत मध्ये या तिन्हीही शहरातील नागरीकांनी भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकहाती सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली आहे. आष्टी शहरात कायम पिण्याच्या पाण्यासाठी लढाई सुरू असते त्यामुळे आष्टी नगर पंचायतच्या नवनियुक्त सदस्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सत्कार सोहळा प्रसंगी मा.आ.भीमराव धोंडे यांनी केले.
मा.आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते आज शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी ११ वा. आष्टी येथील मा.आ.धोंडे यांच्या निवासस्थानी शहरातील नवनियुक्त भाजपा नगरसेवकांचे सत्कार आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना मा.आ.धोंडे म्हणाले, आष्टी नगर पंचायत निवडणूकीत आ.सुरेश धस यांना जागा वाटपात समानता न दाखविल्याने या निवडणूकीत मी जरी सहभाग घेतला नसला तरी शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण मदत केली. कारण येथील स्थानिक राजकारणापेक्षा पक्ष महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आता आपण सर्व नविन सदस्यांनी एकजूटीने कामाला लागून पक्षाचे विचार आणि शहराचा विकास करण्यासाठी अंग झटकून कामाला लागने गरजेचे असून, शहराला कायम भेडसावत असलेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या पाच वर्षात कायम स्वरूपी मार्गी लावावा यासाठी आपणही प्रयत्न करणार आहोत असा विश्वासही मा.आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (अ.जा.) अँड.वाल्मिक निकाळजे, भाजपा सचिव शंकरराव देशमुख, अँड.साहेबराव म्हस्के, रिपाई तालुकाध्यक्ष अशोक साळवे, माजी सरपंच नामदेव राऊत, रंगनाथ धोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
आष्टी नगरपंचायतच्या नवनिर्वाचित भाजपा व महायुतीच्या नगरसेवकांच्या सत्कार समारंभास भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे, जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, प्रा.विनोद ढोबळे, महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस, पं.स.सदस्य यशवंत खंडागळे, मा.पं.स.सदस्य बाबासाहेब गर्जे, एन.टी.गर्जे, भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, भाजपा शहराध्यक्ष बाबुराव कदम, बबन सांगळे, चेअरमन अरुण सायकड, मा.सरपंच आण्णासाहेब लांबडे, अस्ताक शेख, अस्लम बेग, रेहान बेग, अतुल मुळे, अभय गर्जे, सतीश टकले, सर्व पत्रकार बांधव व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here