9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

दिनकर रायकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता क्षेत्रातील पितामह व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड – छगन भुजबळ

- Advertisement -

 

- Advertisement -
  • जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली, एक चांगला मित्र गमावल्याची व्यक्त केली भावना

मुंबई : सतत पन्नास वर्षाहून अधिक काळ समर्पित भावनेने पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील पितामह व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेत मी नगरसेवक म्हणून निवडणून आलो होतो तेंव्हा पासून दिनकर रायकर आणि माझा स्नेह होता. त्यांचा जनसंपर्क हा अतिशय दांडगा होता. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेत काम करणारे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून दिनकर रायकर यांची ओळख होती. टीपी ऑपरेटर, रिपोर्टर, संपादक आणि लोकमत समूहाचे समूह संपादक पदापर्यंतचा त्यांचा पत्रकारितेतील यशस्वी प्रवास थक्क करणारा होता. अत्यंत दांडगा जनसंपर्क असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राजकीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी दीर्घकाळ एक्सप्रेस समूहात पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी दैनिक लोकमत समूहात संपादक ते समूह संपादक पदापर्यंत त्यांनी कामकाज पाहिले. त्यांचा मराठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास हा अतिशय थक्क करणारा असून गेल्या ५० वर्षातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा ते चालता बोलता इतिहास होते.

दिनकर रायकर यांची जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहण्याची भूमिका होती.मराठी पत्रकारितेत त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी मराठी पत्रकारितेची सेवा केली. आजही ते लोकमत समूहामध्ये सल्लागार संपादक म्हणून काम पहात होते. त्यांच्या निधनाने रायकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles