ताज्या बातम्या

वाजवा रे वाजवा अंतर राखून


औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लग्न समारंभातील (marriage Function) गर्दीला संख्येचे बंधन घालण्यात आले होते, त्यामुळे बॅंडबाजाच बंद झाला होता. मात्र कोरोना (Corona Rules)नियमांचे पालन करून आणि दोन डोस घेतलेल्या वाजंत्रीला बॅंड पथकात सहभागी होण्याची परवानगी मिळाल्याने लग्न समारंभातुन कोरोनामुळे हरवलेले सूर पुन्हा कानावर पडणार आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management) प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कोरोनामुळे बॅंडपथकांवर निर्बंध घालण्यात आले होते, यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने बॅंडपथकांच्या परवानगीबाबत प्रशासनाकडून फेरविचार करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकरी सुनिल चव्हाण यांनी आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, सध्या लग्न कार्य व इतर मंगलकार्यांचा काळ आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या ९ जानेवारी २०२२ च्या आदेशातील नियमावलीनुसार लग्न समारंभ व इतर अनुषंगिक कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियम लावण्यात आले आहेत. त्यानुसार अशा कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचे पालन करावे. तसेच यासाठी बॅंड पथकातील वादक कलाकारांच्या रोजीरोटीचा विचार करून काही निर्बंधांसह बॅंड पथकांना परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत आदेश

लग्न सोहळे व इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅंड वाजवणाऱ्या पथकात ज्यांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत तेच वाजंत्री सहभागी होऊ शकतील.

लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्या वाजंत्रींनाच बॅंड पथकात प्रवेश देण्याची संपुर्णत: जबाबदारी बॅंड व्यवस्थापक, मालकाची राहील.

लग्न समारंभाच्या बाहेर सुरक्षित अंतर राखून बॅंडचे सादरीकरण करावे.

बॅंड पथकासाठी सादरीकरणावेळी बॅंड मालकाने थर्मल स्कॅनर, सॅनेटायझरची व्यवस्था करावी.

मास्क, सॅनिटायझर, सहा फूट अंतर आणि आवश्‍यकेतेनुसार फेसशिल्ड वापरणे आवश्‍यक.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *