पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात भीषण अपघात अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

spot_img

बारामती, 19 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात भीषण अपघात (Major accident in Baramati Taluka Pune District) झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला (3 people died on the spot) आहे. कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातता एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. बारामती तालुक्यातील मोरगावजवळ (Morgaon Baramati Taluka) रात्री उशीरा हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली. या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सौ. अश्विनी श्रेणीक भंडारी, मिलिंद श्रेणीक भंडारी आणि सौ.

कविता उदयकुमार शहा अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भंडारी ज्वेलर्स श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी आणि मुलगा प्रथमेश भंडारी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बारामतीतील या तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या बिंदीया सुनील भंडारी यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. वाचा : राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; मात्र समोर आली ही दिलासादायक बाब सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर 16 जानेवारी रोजी सोलापुरात एक भीषण अपघात झाला होता. भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर – विजयपूर महामार्गावर तेरामैल येथे हा भीषण अपघात झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले तिघेही सोलापूर येथील निवासी आहेत. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण असणं आवश्यक असतं. त्यासंदर्भात रस्त्यांच्या शेजारी अनेक ठिकाणी बोर्ड्सही लावण्यात आलेले असतात. मात्र, असे असतानाही अनेकदा प्रवासी आपल्या गाडीचा वेग अधिक ठेवतात आणि त्यामुळे अपघात होत असतात. आता सोलापूर येथून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. भरधाव असलेल्या स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला होता.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...