आष्टी तालुक्यातील पत्रकार बांधवांना हक्काचे पत्रकार भवन नसल्याने कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी जागा नाही त्यामुळे अडचणी निर्माण होत आहे तरी दोन आमदार व दोन माजी आमदार यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी व पत्रकार भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावावा अशी सर्व पत्रकार बांधवांची मागणी आहे.
अविनाश कदम – अध्यक्ष आष्टी तालुका युवा पत्रकार संघ
बीड : आष्टी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही आष्टी तालुक्यातील पत्रकार भावनाला आष्टी येथे जागा मिळत नसल्याने येथील आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने नियोजीत जागेसमोर ६ जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उघड्या जागेवर जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आष्टी येथील नवीन न्यायालयाच्या इमारती समोरील आरोग्य विभागाची जुनी कालबाह्य झालेली जागा पत्रकार भवनाला देण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारानी लाऊन धरली आहे मात्र ही जागा मिळत नसल्याने गुरूवारी आष्टीतील युवा पत्रकार संघाने या जागेवर उघड्यावर दर्पण दिन साजरा करत अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली आहे.मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून, निर्भीड पत्रकारितेचा वारसा देणाऱ्या जांभेकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,सचिव अविशांत कुमकर,उपाध्यक्ष निसार शेख, जावेद पठाण,यशवंत हंबर्डे,आण्णासाहेब साबळे, संतोष नागरगोजे,अक्षय विधाते,शहानवाज पठाण,प्रेम पवळ,तुकाराम भवर,मसूर पठाण, दिपक भुजबळ,शेषेराव शेकडे,पंडीत घोडके आदी उपस्थित होते.
We’re a group of volunteers and starting a new scheme in our community.
Your site provided us wityh valable informatin to work on. You’ve done aan impressive job
and our entire community will be grateful to you. https://mobileslot.evenweb.com/