ताज्या बातम्या

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या प्रदीप कुटेची चमकदार कामगिरी बेळगाव येथील ‘ऑल इंडिया ट्रेक कॅम्प’ मध्ये ठरला उत्कृष्ट कॅडेट


श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या प्रदीप कुटेची चमकदार कामगिरी बेळगाव येथील ‘ऑल इंडिया ट्रेक कॅम्प’ मध्ये ठरला उत्कृष्ट कॅडेट

देऊळगाव राजा : स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान
महाविद्यालयातील ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रदीप कारभारी कुटे या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटने २६ कर्नाटक बटालियन बेळगाव येथे दि. १४ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित सात दिवसीय ‘ऑल इंडिया ट्रेक कॅम्प’ मध्ये अनेक उपक्रमात सहभाग नोंदवून सर्वोत्तम कॅडेट म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. यासाठी २६ कर्नाटक बटालियन बेळगाव तर्फे या कॅडेटला सुवर्णपदक, कास्यपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रदीप कुटेच्या या यशाबद्दल १३ महाराष्ट्र बटालीयन एन.सी.सी खामगाव येथील कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल समीर चौधरी, श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, एन.सी.सी. ए.एन.ओ. प्रा. डॉ. महेश तांदळे, एन.सी.सी. केअर टेकर प्रा. डॉ. गजानन तांबडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *