शरद पवार गटाकडून चार चिन्हं निश्चित, एकाची निवड होणार

spot_img

मुंबई: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यानंतर आता शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय.

चार चिन्हांची निवड, एकाची निवड होणार

शरद पवार गटाकडून त्यांच्या नव्या पक्षासाठी चार चिन्हांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड ही करण्यात येणार आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

– महाराष्ट्रातील 41आमदार
– नागालँडमधील 7 आमदार
– झारखंड 1 आमदार
– लोकसभा खासदार 2
– महाराष्ट्र विधानपरिषद 5
– राज्यसभा 1

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा – 3

शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा

शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचा व्हिप मानायचा का नाही हा शरद पवार गटासमोर प्रश्न असणार आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...