इस्रायली सैन्याला सापडले हमासचे घबाड ! छाप्यात जप्त केला ८ लाख डॉलर

spot_img

इस्रायली सैन्याने खान युनिस शहरामध्ये हमासच्या ठिकाणावर घातलेल्या छाप्यामध्ये मोठे घबाड जप्त केले. हमास या दहशतवादी संघटनेचे तब्बल ३ दशलक्ष शेकेल्स (इस्रायली चलन) इस्रायली सैन्याने जप्त केले आहे.

या चलनाची किंमत ८ लाख १९ हजार डॉलर इतकी आहे, असे इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटले आहे.

खान युनिस हे गाझामधील दुसर्‍ या क्रमांकाचे शहर आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवारचा हा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. या ठिकाणी हमासचे मोठे आर्थिक व्यवहार होत होते. हमाससाठी आंतरराष्ट्रीय चलनाची आदलाबदल देखील या ठिकाणी केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे इस्रायली सैन्याने हा छापा घातला होता. या ठिकाणी शेकेल्स, डॉलर आणि अन्य अरब देशांच्या चलनामध्ये मोठा निधी आढळून आला आहे. याशिवाय याठिकाणी आढळलेली हमासशी संबंधित काही गुप्त कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद सारख्या गटांच्या अड्ड्यांवर सापडलेली ही रोकड इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या वित्त विभागाकडे जमा करण्यात येते. तेथे ही रक्कम मोजली जाऊन नंतर तिजोरीमध्ये जमा केली जाते.

अल-अमानमध्ये पॅराशूटद्वारे उतरले इस्रायली सैनिक
इस्रायली सैन्याच्या पॅरा ट्रुपर्सनी खान युनिस शहराच्या पश्‍चिमेकडील अल-अमान भागात पॅराशूनद्वारे उतरून जोरदार कारवाई केली आहे. हा भाग हमासचा गड मानला जातो. इस्रायली सैन्याने भूगर्भातील बोगदे, शस्त्रे निर्मिती सुविधा, टेहळणी पोस्ट आणि दहशतवादी कारवायांसाठी इतर पायाभूत सुविधा आढळून आल्या आहेत. येथे दहशतवाद्यांनी भूसुरुंग पेरुन ठेवले होते. इथल्या बहुतेक दहशतवाद्यांना इस्रायली सैन्याने ठार केल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...