ताज्या बातम्या

शेतकऱ्याच्या गाडीला काँग्रेस आमदाराच्या कारची धडक, 1 ठार


अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा आणि शेतातून परत येणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर चार मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ बिलियनमध्ये स्नेहसंमेलनात भेट घेण्याकरता माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांचा ताफा दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांची गाडी त्यांच्याच मागे ताफ्यामध्ये होती. शेतकरी असणारे मोहम्मद खालीक हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये मजुरांना भरून दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक मारली. सुदैवाने आमदार बळवंत वानखडे हे यशोमती ठाकूर यांच्या गाडीत बसलेले होते. आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर आणि त्यांचे शासकीय स्विय सहायक होते. मजुरांच्या ट्रॅक्टरला धडक एवढी जबरदस्त होती की, आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा अक्षरशः चूराडा झाला. या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतमालक महंमद खालीक यांचा जागीच मृत्यू झाला असून मजुरांपैकी पाच जण जखमी झाले आहेत.

तर म.खलिक म अमजद शमीम, सुरेश शामराव सावळे, विमाला बाई जानराव राऊत, संगीता संजय नांदणे, नीता उमेश सावळे आणि संजय सुरेश इंगळे जखमी झाले आहे. या अपघातात मृत झालेले मोहम्मद खालीक हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक 6 चे अध्यक्ष आहेत. सदर घटनास्थळी जखमींना नेण्यासाठी तातडीने शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात करण्यात आली होती. काही वेळ मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी व दर्यापूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्यासह पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे, उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विधवेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *