क्राईमताज्या बातम्यापुणे

लाच प्रकरणी राजगुरुनगर पालिकेेचे तीन वरिष्ठ कर्मचारी अटकेत


पुण्याच्या राजगुरुनगर पालिकेचे तीन वरिष्ठ कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. यामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराची जाेरदार चर्चा शहरात सुरु आहेराजगुरुनगर पालिकेच्या आरोग्य विभागात पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना चारुबला हरडे यांना एसीबीने रंगेहात पकडले. यावेळी लाच स्विकारण्यास प्रोत्साहन देणा-या प्रविण कापसे, श्रीकांत लाळगे या दोन कर्मचा-यांना देखील अटक  करण्यात आली. एकाच वेळी पालिकेत तीन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आल्याने पालिकेत होत असलेला भष्ट्राचार समोर आला आहे. दरम्यान राजगुरुनगर पालिकेची नव्याने होत असलेली पाणी योजना, सांडपाणी योजना, रस्ते याबाबतही भष्ट्राचार झाल्याची चर्चा आहे. त्यावरही लाचलुचपत विभागाकडुन (acb) चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *