वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार सर्वांत अधिक काळ पाहिलेल्या, स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड 1 जूनपासून विजेअभावी अंधारात आहे. मात्र, गडाला वीजपुरवठा करणार्या वीजवाहिन्यांवर झगमगाट दिसून येत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे गडाचा वीजपुरवठा बंद असताना पुरातत्व खात्याला वीजबिल मात्र दर महिन्याला येत आहे.
एकही युनिट वीज वापर नसतानाही ऑगस्ट महिन्यात 11 हजार 320 रुपये वीजबिल आले आहे. राजगडावरील डागडुजीची कामे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होती. तोपर्यंत गडावर वीजपुरवठा कसाबसा सुरू होता. मात्र, 1 जूनपासून गडावरील वीज बंदच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज राजसदर, पद्मावती मंदिर, पुरातत्व कार्यालय परिसर अंधारात आहे.
पुणे विद्यापीठाच्या कर्मचार्यांना मिळणार सीपीआरचे प्रशिक्षण