ताज्या बातम्या

चांद्रयान ३ मध्ये विराजणार गणपती बाप्पा !


नागपूर,

गणपती सेना उत्सव मंडळ, मोतीबाग रेल्वे कॉलनी नागपूर यावर्षी आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. भारताची वैज्ञानिक प्रगती दाखवण्याच्या उद्देशाने मंडळातर्फे यावर्षी चांद्रयान 3 ची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.त्यात 12 फूट उंचीची गणेशमूर्ती बसवण्यात येणार आहे. चांद्रयानचा संपूर्ण प्रवास डिजिटल लाईट्सच्या माध्यमातून चित्रित करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. चांद्रयान 3 नुकतेच इस्रोने चंद्रावर पाठवले आहे; जी संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.

 

या पेंडॉलचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख यजमान एम. प्रभाकर राव आणि एम. लक्ष्मी राव होते. चांद्रयान 3 ची प्रतिकृती आनंद असुदानी डेकोरेशनने तयार केली आहे. पूजन राजेश द्विवेदी यांनी केले. अशोक पटनायक, दीपंकर पाल, राकेश पाली, सी. प्रकाशराव, राकेश पाचपुते, पी. सत्यराव, उमेश राव, प्रतीक हरडे, राज घुगुस्कर, अंशुल, कन्या राव, निरुपमा पटनायक, सी. रामबाई, प्रज्ञा श्रीवास, प्रीती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

गणेश मंडप उभारून देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याचा प्रयत्न मंडळ दरवर्षी करत असते. गतवर्षी ‘बापू की कुटी’ करून बाप्पा विराजमान झाले होते. यापूर्वी संसद भवन, जंतरमंतर, अनेक ऐतिहासिक मंदिरांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गणपती सेना उत्सव मंडळातर्फे पेंडॉलच्या माध्यमातून एड्स, कोरोना, बेटी वाचवा, पाणी वाचवा याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. ज्याला प्रशासनाकडून बक्षीसही देण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *