पुणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत होते. हे अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून मोठी योजना हाती घेतली गेली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेया योजनेनुसार परिवहन विभागाकडून वेगवेगळ्या स्तरावर काम केले गेले. यामुळे गेल्या सहा महिन्यांत अपघातांचे प्रमाण २० टक्के कमी झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सलग २४ तास परिवहन विभागाने पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर कारवाई केली. त्यामुळे अपघात मृत्यू होण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे.
काय केल्या उपाययोज
पुणे मुंबई महामार्गावर वाढलेल्या अपघातांमुळे आरटीओच्या वायुवेग पथकाने २४ तास कारवाई सुरु केली. गेल्या सहा महिन्यात नियम मोडणाऱ्या अनेक वाहनचालकांना दंड केला आहे. त्यात वाहन चालवताना लेन कटिंग मोडणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहने चालवले, सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाई झाली. दहा हजारपेक्षा जास्त वाहनधारकांनी वेगाचा नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आणि वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन अशा विविध कारणांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे प्रमाण घटलेले पाहायला मिळाले.ना.