ताज्या बातम्या

अहमदनगरमध्ये भारतविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणाला न्यायाधीशांसमोरच मारहाण


अहमदनगर, साहेबराव कोंकणे : अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच मारहाण करण्यात आली आहे.अचानक घडलेल्या या घटनेमुळं न्यायालयात चांगलाच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. अमाेल हुंबे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अमोल हुंबे हे शिवसेनेचे युवा संघटक आहेत.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर काही तरुणांनी भारताविरोधी घोषबाजी केली होती.

 

या तरुणांना पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केलं. मात्र सुनावणी सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी अमोल हुंबे यांनी या तरुणांना मारहाण केली. या प्रकारामुळे न्यायालयात चांगलाच गोंधळ उडाला.दरम्यान त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अमोल हुंबे यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. परंतु त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं.

 

मात्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही मारहाण झाल्यानं या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नाशिकमध्येही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दरम्यान बुधवारी देखील नाशिकमधून अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्यानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या तरुणावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादाब शौकत कुरेशी असं या आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *