नेटकऱ्यांनी उडवली इशान किशनच्या हेअरस्टाईलची खिल्ली ; म्हणाले, “धोनीची…”

0
42
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर इशान किशन हा भारतामध्ये परत आला आहे. भारतात येताच इशान किशनने सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमच्या स्टुडिओमध्ये जाऊन हेअरकट केल्याचं दिसून येत आहे. इशान किशनच्या नवीन हेअरकटची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.इशान किशनने एमएस धोनीची कॉपी केल्याचं काही क्रिकेट चाहत्यांनी म्हटलं आहे.

इशान किशनचा हा नवीन हेअरकट बघितल्यानंतर काही चाहत्यांना एमएस धोनीची कमतरता जाणवत आहे. कारण की इशानने धोनीच्या हेअरकटची कॉपी केली आहे. धोनीने आयपीएल २०२१ मध्ये अशाच प्रकारची हेअरस्टाईल केली होती. यावरून नेटकरी इशानची चांगलीच टिंगल उडवत आहेत. “धोनीला ‘आदिदास’ (ओरिजनल ब्रँड) आणि इशानला ‘अबीबास’ (बनावट ब्रँड)” असं म्हणत खिल्ली उडवताना दिसत आहे. तर “थालाने इशानला चुकीचा सल्ला दिला”, असंही एकानं म्हटलं आहे.वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलग चार अर्धशतके इशान किशनने झळकावली होती. मात्र टी-२० मालिकेत त्याला बरोबर अशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे, शुक्रवारपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इशानची संघामध्ये निवड करण्यात आली नाही. आता सर्वांना आशिया चषक २०२३ मध्येत्याउलट भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत इशान किशन आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीबद्दल निराशा व्यक्त करत म्हटलं आहे की, “फक्त आयपीएलमध्ये चांगलं काम केल्यानं टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकण्यास मदत होणार नाही”. इशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here