19.1 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी हे सुपरफूड खा

- Advertisement -

भारतात दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळतात. डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य संसर्ग आहे, तो थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. ताप येणे, स्नायू आणि सांधे दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, तळवे फिकट होणे इत्यादी डेंग्यूची लक्षणे असू शकतात.डेंग्यू मध्ये आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा रुग्ण बरा होणे हे आहारावर देखील अवलंबून असते. डेंग्यूमध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्स खूप कमी होतात, जास्त प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे मृत्यू देखील होवू शकतो. म्हणून आज आपण डेंग्यूमध्ये लवकर बरे होण्यासाठी काय खावे हे सांगणार आहोत.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

डेंग्यूमध्ये हे सुपरफूड जरूर खा

 

भाज्या

 

डेंग्यूमध्ये रुग्णाने भाज्या विशेषतः पालक, भोपळा, लाल सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली आणि बीटरूट खाणे आवश्यक आहे. या भाज्या तुमच्या प्लेटलेट्सची संख्या वाढवतील, ज्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. तसेच यातील अनेक भाज्या तुम्ही कच्च्या खाऊ शकता ज्याचा तुम्हाला जास्त फायदा होवू शकतो.

 

 

फळ

 

डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के दोन्ही आवश्यक आहेत. अशा वेळी आपण फक्त लिंबू, संत्री, किवी किंवा टेंगेरिन यांसारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ नयेत, तर स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, टोमॅटो किंवा मनुका ही फळेही खावीत. अनेक फळांचे ताजे ज्युस मिळतात तेही तुम्ही घेवू शकता.

 

 

सुका मेवा

 

प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात. सुक्या मेव्यामध्ये नट आणि बदाम हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. शेंगदाणे आणि पिस्ता हे पचायला थोडे कठीण असले तरी खूप फायदेशीर आहेत. या काळात तुम्ही शेंगदाण्याचे तेलही स्वयंपाकघरात वापरू शकता.

 

 

हळद

 

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी हळदीचे सेवन खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून तुम्ही दूधासोबत हळद घेवू शकता.

 

 

पपईची पाने

 

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी पपईची पाने रामबाण उपाय आहेत. पपईची पाने पिळून त्याचा रस प्या किंवा पपईची पाने पाण्यात उकळून त्याचे द्रावण प्या. डेंग्यू तापाच्या उपचारासाठी हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल.

 

 

नारळ पाणी

 

डेंग्यूमध्ये नारळ पाणी प्यावे. खरं तर नारळ पाणी प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. नारळाच्या पाण्यातून केवळ अ, ब आणि क जीवनसत्त्वे मिळत नाहीत तर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस ही खनिजे देखील असतात.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles