सरन्यायाधीश श्री. धनंजय चंद्रचूड यांना अभिनंदनाचे पाठविले पत्र.
पुणे दि.१७: सर्वोच्च न्यायालयाने ‘हँडबुक ऑन कॉम्बेटिंग जेंडर स्टिरियोटाइप’ या माहिती पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. यामुळे समाजामध्ये महिलांचा सन्मान वाढविला जाणार आहे.हे एक महिलांसाठीचे स्वागतार्ह पाऊल असल्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले असून सरन्यायाधीश यांचे अभिनंदन केले.
मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील नियम सर्व कायदेशीर संस्थांना बंधनकारक राहणार आहेत. हे पुस्तक बनविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी यामध्ये योगदान दिले त्या सर्वांचे डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश श्री. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवार दिनांक १६ ऑगस्ट,२०२३ रोजी ‘हँडबुक ऑन कॉम्बेटिंग जेंडर स्टिरियोटाइप’ या माहिती पुस्तिकेचे अनावरण केले. या पुस्तिकेत लैगिंक भेदभाव, महिलांविषयी रुढीवादी विचार अधोरेखित करणाऱ्या शब्दांचा समावेश आहे. या शब्दांचा वापर कोर्टाच्या कामकाजात होऊ नये यासाठी पर्यायी शब्दांची यादी यामध्ये देण्यात आली आहे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.