शरद पवार त्यांच्या हयातीत भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणार नाहीत”

0
130
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या हयातीत भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणार नाहीत, असा विश्‍वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढच्यावर्षी स्वातंत्र्यदिनी इंडिया आघाडीचा नेताच पंतप्रधान म्हणून लालकिल्ल्यावर झेंड फडकावेल आणि संपुर्ण देश त्या शुभमुहुर्ताची वाट पहात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की ते जिवंत असेपर्यंत भाजपशी हातमिळवणी करतील असे वाटत नाही. ते त्यांच्या पक्षाची पुनर्बांधणी करत आहेत, असे राऊत म्हणाले.

पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांना काही ऑफर दिली का, असे विचारले असता राऊत म्हणाले, अजित पवार शरद पवारांना ऑफर देण्याइतके मोठे कधी झाले?ते म्हणाले की, शरद पवार यांनीच अजित पवारांना घडवले आहे. शरद पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेकवेळा केंद्रीय मंत्री राहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here