श्रावण महिन्यानिमित्त शनिचौथरा सकाळच्या वेळेत भाविकांसाठी खुला राहणार; भक्तांना जलाभिषेक करता येणार

0
108
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

हिंदू पंचागानुसार पवित्र मानला गेलेला श्रावण महिना गुरुवारपासून सुरू होत आहे. या पवित्र श्रावण मासपर्वानिमित्त श्री शेत्र शनिशिंगणापूर येथे शनि महाराजांना जलाअभिषेक करण्यासाठी संपूर्ण महिनाभर शनी चौथरा पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळेत भाविकांसाठी दोन तास दर्शन खुले राहणार आहे.

यावेळी भाविकांना थेट चौथ्यावर जात जलाभिषेक , तेल अर्पण करून दर्शन घेता येणार आहे. श्रावण पर्वकाळात ही सुविधा सर्वांसाठी मोफत असणार आहे.

शनिशिंगणापूरात श्रावण महिन्यात परिसरातील नव्हे तर जिल्हा राज्यभरातील भाविकांची संख्या मोठी असते. श्रावण पर्वकाळ सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रूढी परंपरा व प्रथेनुसार अनेक वर्षापासून शनिशिंगणापूर येथे भाविक शनि मूर्तीला जलाभिषेक अर्पण करतात. ही प्रथा आजही कायम आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी येथील चौथरावरील दर्शन प्रवेश बंद केला आहे. भाविक चौधऱ्याखालूनच दर्शन घेतात. मात्र, देणगी पावती भरून पेड दर्शन सुरू आहे. भाविकांना पैसे मोजून थेट चौथऱ्यावर प्रवेश मिळतो. त्यामुळे चौथऱ्यावर जात थेट शनि मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या कमी असते.

श्रावण महिना पवित्र महिना मानला जात असल्याने प्रथेनुसार शनि महाराजांना ओल्या वस्त्राने चौथरावर शनी मुर्तीला थेट जलाभिषेक व तेल अर्पण करण्याची सुविधा गुरुवारपासून ही दर्शन व्यवस्था सुरू होत आहे. त्यामुळे भाविकांना पहाटे 5 ते 7 या वेळेत मोफत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा संपूर्ण महिनाभर चालणार आहे. श्रावण पर्वकाळ असल्याने शनिशिंगणापूरात दूरदूरचे भाविक तसेच परिसरातील भाविकांकडून भंडारा व अन्नदान घातले जाणार असल्याने दररोज किमान 40 ते 50 हजार आणि शनिवारी लाखांवर भाविकांची उपस्थिती पहावयास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here