ताज्या बातम्या

सचिन पायलट यांनी घेतली भाजप नेत्याची शाळा, माझ्या वडिलांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात…


जयपूर : काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी त्यांचे वडील दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्यावर भाजप नेत्याने केलेल्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने चुकीची तथ्य सांगू नयेत, असेही पायलट यांनी सांगितले.

सचिन पायलट यांनी एका दस्तऐवजासह भाजपच्या प्रचाराला उत्तर दिले आहे.

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करत मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. राजेश पायलट हे भारतीय हवाई दलात कार्यरत असताना त्यांनी मिझोरममध्ये बॉम्बफेक केली असल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला.

मालवीय यांनी हा व्हिडिओ  (ट्विटर) वर पोस्ट केला. आपल्या पोस्टमध्ये मालवीय यांनी म्हटले की, राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान चालवले. या दोघांनी 5 मार्च 1966 रोजी मिझोरामची राजधानी आयझॉलवर बॉम्ब टाकला होता. नंतर ते दोघेही काँग्रेसचे खासदार आणि नंतर मंत्री झाले. ईशान्येत आपल्याच लोकांवर हवाई हल्ले करणाऱ्यांना इंदिरा गांधींनी राजकारणात स्थान दिले, बक्षीस म्हणून सन्मान दिला, हे स्पष्ट आहे, असे मालवीय यांनी म्हटले.

सचिन पायलट यांचा पलटवार

अमित मालवीय यांनी केलेल्या पोस्टला सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिले. पायलट यांनी म्हटले की, तुमच्या जवळ चुकीची तारखी, चुकीचे तथ्य आहेत. हां, माझ्या वडिलांनी हवाई दलाचे पायलट म्हणून बॉम्ब फेकले होते. मात्र, 1971 च्या युद्धा दरम्यान तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर बॉम्बफेक केली होती. 5 मार्च 1966 रोजी मिझोरममध्ये हवाई हल्ला झाला होता. तर, राजेश पायलट हे 29 ऑक्टोबर 1966 रोजी भारतीय हवाई दलात रुजू झाले होते.

सचिन पायलट यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक प्रमाणपत्रही जोडले आहे. त्यांनी म्हटले की, 1980 च्या दशकात एक राजकीय नेता म्हणून माझ्या वडिलांनी मिझोरममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

अविश्वास प्रस्तावावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी केला होता उल्लेख

गेल्या आठवड्यात लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील हवाई दलाच्या कारवाईबाबत भाष्य केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मिझोरामविरुद्ध भारतीय हवाई दलाचा वापर केला होता. मिझोरामचे नागरिक देशाचे नागरीक नाही का, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *