मुळशीमध्ये बंधाऱ्यात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू

0
93
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

हिंजवडी : मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मदुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली.

हर्षित पोटलुरी (वय.२७) असे मृत्यूमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नावं असून तो मुळचा राजमुन्ड्री, आंध्रप्रदेशातील असल्याचे समजते. काही महिन्यांपासून तो हिंजवडी येथे वास्तव्य करत असून, तो आयटीपार्क फेज तीन मधील एका नामांकित आयटी कंपणीत नोकरी करत असल्याचे समजते.

स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्याने हर्षित आपल्या दोन मित्रांसमवेत रिहे बंधारा परिसरात फिरायला गेला होता. बंधाऱ्यात पोहायला उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटना समजताच रिहे गावचे उपसरपंच काकासाहेब शिंदे, पोलीस पाटील नंदकुमार मिंडे, सामाजिक कार्यकर्ते केशव पडळघरे यासह ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ पौड पोलीस स्टेशन, अग्निशमन दल तसेच मुळशी आपत्कालीन टिमचे प्रमोद बलकवडे यांच्याशी संपर्क साधला.

साधारणतः तीन तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, जगविख्यात हिंजवडी आयटीपार्क पासून अवघ्या पंचवीस – तीस मिनिटाच्या अंतरावर सदर घटना घडली असून, मदतीसाठी यंत्रणा घटनास्थळी पोहचायला दोन तासाहून अधिक वेळ लागल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पौड पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here