ताज्या बातम्या

47 लाखांचा गंडा; दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद, यवतमाळमधील 5 मोठ्या घडामोडी


भास्कर मेहरे, यवतमाळ 13 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता यवतमाळमधूनही काही हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यवतमाळमध्ये घडलेल्या काही महत्त्वाची आणि धक्कादायक घटनांची माहिती पाहूया.केंद्रीय मंत्रालयातील निर्देशक असल्याचं सांगून 47 लाखांचा गंडा -केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातील निवड निर्देशक सल्लागार समिती सदस्य आहे, असे सांगून दोघांनी यवतमाळमधील पाच जणांना गंडा घातला.

या दोघांनी 47 लाख रूपये उकळले. लोकांचा विश्वास पटविण्यासाठी त्यांनी नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावली. नंतर पैसे घेऊन उडवाउडवीची उत्तरं सुरू केली. यातील एकाविरुद्ध 2022 मध्येच फसवणुकीचा गुन्हा असल्याची नोंद आहे.

याप्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारीवरुन यवतमाळच्या अवधुतवाडी पोलीस ठाण्यात मीरा प्रकाश फडणवीस आणि साथीदार अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहेदुचाकी चोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद – यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र आरोपी सापडत नव्हते. अखेर एका दुचाकी चोरीच्या प्रकरणात घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील चौघांच्या टोळीला अटक केली गेली. त्यानंतर मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले असून 21 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

त्यांनी महाराष्ट्र, तेलंगणा या दोन्ही राज्यातून दुचाकी चोरी केल्या आहेत. करमेश्वर नामदेव जंगले (25), साईनाथ भारत धुर्वे (26), गजानन विष्णू कुमरे (19), अजय वामन कुमरे (24, सर्व रा. पार्डी ता. घाटंजी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव युरियाचा तुडवडा; विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार, वाशिम जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या22 हजाराची लाच घेताना गटविकास अधिकाऱ्याला अटकपांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी विहिरीचं बिल काढण्यासाठी 22 हजार रुपयाची लाच मागितली. या प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर गटविकास अधिकारी विठ्ठल जाधवला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. लाभार्थ्याकडून तयार करण्यात आलेल्या विहिरीचे बिल काढण्यासाठी गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव याने 23 हजाराची लाच मागितली होती. अखेर 22 हजार रुपये देण्याचे ठरले, त्यावरून सापळा रचला.

त्यानंतर सापळा रचून जाधव याला अटक करण्यात आली.टीपेश्वर लगत रिसॉर्टचे अवैध बांधकामयवतमाळ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तातापूर येथे एका रिसॉर्टचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अवैध असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली. या रिसॉर्टचं बांधकाम करत असताना ग्रामपंचायतकडून परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी या रिसॉर्टला विरोध केला असून कारवाई संदर्भात तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *