भारतीय जनता पक्षाने शनिवारी (दि.१२ ऑगस्ट) राहुल गांधी यांना प्रश्न केला की सशस्त्र दल हिंसाचार झालेल्या मणिपुरमध्ये भारतीयांवर गोळीबार करतील का? यावेळी दावा करण्यात आला की राहुल गांधींच्या मनात थोडीही लोकशाही शिल्लक नाही.
राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं की जर सशस्त्र दलांना परवानगी दिली तर काही दिवसांमध्ये राज्यात शांतता प्रस्थापित करु शकतात.
यावर भाजपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न केला. ते म्हणाले की १९६०मध्ये इंदिरा गांधींनी एझवॉलमध्ये वायुसेनेच्या कारवाईचे आदेश दिले होते, राहुल गांधींनाही तसचं वाटतय का ?
रविशंकर प्रसाद म्हणाले की, “राहुल गांधींना वाटतय का की सशस्त्र दल मणिपुरमध्ये भारतीयांवर गोळी चालवतील? की त्यांनी सद्भावना परवली पाहिजे आणि भारतीयांना एकजुट करण्यासाठी कार्य केलं पाहिजे.” त्यांनी स्पष्ट केले की मणिपुरमध्ये दोन्ही समुदायांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. रविशंकर यांनी राहुल गांधींवर संसदेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप लावला.
लोकसभेत गांधींनी केलेल्या भाषणातील काही वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आले होते. मात्र, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर केलेल्या आरोपांची पुनरावृत्ती केली. त्यांनी आरोप केला की सरकारच्या राजकारणामुळे मणिपुरमध्ये भारत मातेची हत्या झाली. रविशंकल म्हणाले की राहुल गांधींना देश समजत नाही आणि देशाचं राजकारणही समजतं नाही. भाजपच्या या नेत्याने विरोधकांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वारंवार गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
Narendra Modi : मी गरीबांना उपाशी झोपू देऊ शकत नाही; कोरोना काळातील आठवणींनी PM मोदी भावूक
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी शुक्रवारी म्हणाले की कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणातून अनेक असंसदीय शब्द हटवण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या भाषणातून असं वाटतय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलय. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आज केलेलं वक्तव्य देशाच्या हितामध्ये नाहीये, त्यांच्यात सामंजस्य नाहीये आणि असं वाटतय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलय.”
रविशंकर कॉंग्रेसवर टीका करत म्हणाले की ‘ग्रॅंड ओल्ड पार्टी’बेजबाबदारपणे वागत आहे. राहुल गांधींनी आरोप केला होता की मणिपुर आगीत जळतोय, खुन आणि बलात्काराच्या घटना वाढतं आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत ज्या पद्धतीने विनोद केले, ते त्यांना शोभत नाही.
जनमत शरद पवारांसोबत असल्यानेच…; काका-पुतण्याच्या भेटीवर वडेट्टीवारांचे विधान