आशिया चषकापूर्वी अफगाणिस्तानने ‘या’ भारतीयाची प्रशिक्षकपदी केली नियुक्ती, आपल्याच संघाविरुद्ध बनवणार रणनीती

0
71
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2023) अफगाणिस्तान क्रिकेट संघाला (ACB) पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत.आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका माजी भारतीय खेळाडूची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या खेळाडूला प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मिलाप प्रदीपकुमार मेवाडा (Milap Pradeepkumar Mewada) यांची राष्ट्रीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच ते संघात सामील झाले आहे. जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यावर ते अफगाणिस्तान संघासोबत होते. त्याचे काम पाहून त्याला पूर्णवेळ कंत्राट देऊ करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here