शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावरून मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना काही प्रश्न केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी याबाबतचे पत्रच आयुक्तांना पाठवले असून लवकरात लवकर उत्तरं देण्याची मागणी केली आहे.’ या तपासाची पद्धत काय आहे ? तसेच महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत तपासणी करण्यात येणार की बाहेरील संस्थेकडून किंवा कायदेशीर तपासणी करण्यात येणार आहे?, DMC, ज्यांच्या माध्यमातून ही निविदा प्रक्रिया सुरू केली आणि जे अजूनही आम्हाला उत्तर देत आहेत, त्यांची विभागीय चौकशी होणार आहे का?, ज्यांनी दरांबाबत बाह्य माहिती दिली आहे. (आम्हाला दिलेल्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे शहरी नियोजक आणि डिझाइनर), ते या तपासणीचा भाग असतील का? , समितीचा एक भाग म्हणून, सहाय्यक आयुक्त या तपासाचा भाग असतील का?, मला आधीच्या पत्रात उत्तर मिळाल्याप्रमाणे, सर्व दर ‘कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी ने ठरवले होते, म्हणजे आपण का? आपण जर या फाईल वर सही केली असेल, तर आपण देखील या चौकशीला सामोरे जाणार का ?’, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारले असून त्यासोबतच त्यांनी ‘आयुक्तांकडून थेट उत्तराची आशा आहे, ते न मिळाल्यास माझ्या राज्याच्या हितासाठी, मला महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा लागेल’, असा इशाराही दिला आहे.
Home ताज्या बातम्या अन्यथा मला विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा लागेल, आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा