19.1 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित !

- Advertisement -

Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय.

- Advertisement -

कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराबाबत नवीन माहिती दिली आहे.

- Advertisement -

31 जुलै रोजी युनायटेड किंगडममध्ये हा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर दररोज नवीन प्रकरणं सतत समोर येत आहेत. अशातच आता WHO ने EG.5 या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट ( variant of interest ) म्हणून वर्गीकृत केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटलंय?

सध्या कोरोनाचा हा स्ट्रेन अमेरिका, यूके आणि चीनमध्ये पसरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की, हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत धोकादायक नाहीये. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या कुटुंबातील असल्याने त्याची लक्षणं ही कोरोनाच्या जुन्या प्रकारांसारखीच दिसून येतायत.

या नव्या व्हेरिएंटची लक्षणं-

नाक गळणं
डोकेदुखी
सतत थकवा वाटणं
शिंका येणं
घसा खवखवणं
इंग्लंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युनायटेड किंग्डममध्ये सापडलेला हा स्ट्रेन जदल गतीने पसरणारा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे उत्पन्न झाला आहे. त्याचसोबत ब्रिटनची स्वास्थ्य सुरक्षा एजेंसी ( UKHSA ) यांच्या सांगण्यानुसार, EG.5.1 ला ‘एरिस’ हे उपनाव देण्यात आलं आहे.

UKHSA च्या लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रॅमसे म्हणाल्या, ‘आम्ही या आठवड्यातील अहवालांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. सर्व वयोगटातील लोक, विशेषत: वृद्ध लोक मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचं चित्र आहे. नियमितपणे हात धुतल्यास कोरोना आणि इतर बॅक्टेरिया टाळू शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा व्हेरिएंट फारसा गंभीर नसल्याचं मानलं जातंय. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीत या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या केवळ 14.6 टक्के आहे. UKHSA च्या ‘रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम’ द्वारे नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles