सलमान आणि जॅकलिनचं खास नातं उघडकीस, यामुळंच अडचणीत आली अभिनेत्री

0
68
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मैत्री आजही कोणपासून लपून नाही, असं कोणी क्वचितच कोणी असेल ज्याला या दोघांच्या मैत्री विषयी माहिती नसेल. अनेकदा जॅकलिन आणि सलमान एकत्र दिसले आहेत.

आज जॅकलिन आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री विषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं आणि याच निमीत्ताने आज आम्ही तुम्हाला जॅकलिनच्या आणि सलमान नात्याविषयी सांगणार आहोत.

सलमान आणि जॅकलिनची जवळिकता इतकी वाढू लागली होती की, यांच्या अफेअर्सच्या बातम्यांनी जोर धरला होता. तर अनेकांनी हे दोघं लवरच लग्न बधनात अडकू शकतात अशी अटकळही बांधायला सुरुवात केली होती. लॉकडाऊनच्या काळात सलमान आणि जॅकलिन एकत्र फार्म हाऊसवर राहत होते. सलमानच्या फार्म हाऊसचे खासगी फोटो अनेकदा सोशल मीडियावर समोर आले होते. ज्यात अभिनेता जॅकलिनसोबत त्याचा वेळ घालवताना दिसला होता. मात्र य दोघांच्या नात्यात अचानक दुरवा आल्याच्या बातम्याही चर्चेत येऊ लागल्या.

सलमान आणि जॅकलिन ऐकमेकांशी बोलतही नाहीत अशी चर्चा सुरु झाली आणि यामागचं कारण होतं, जॅकलिनचं मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आलेलं नाव. मीडिया रिपोर्टनुसार अशीही चर्चा होती की, या घटनेनंतर जॅकलिन एकटी पडली आहे. तिचा मित्रपरिवाराही तिच्यापासून दूर झाला आहे. यामध्येच सलमान खानचं नावही समोर आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांच्या मैत्रीत फूट पडली.

मित्रांसाठी नेहमी तत्पर असणारा अशी ओळख सलमानची आहे. अनेकदा त्याने केवळ मैत्रिखातर विविध चित्रपटांमध्ये छोटीशी का होईना भूमिकाही केली आहे. जॅकलिन आणि तिच्यामध्ये तरं खास नातं आहे. सलमानच्या घरी होणाऱ्या प्रत्येक पार्टीमध्येही ती सहभागी व्हायची. मात्र मिड डेच्या रिपोर्टनुसार सलमान खानला कायदेशीर अडचणींमध्ये अडकायचं नव्हतं. तो स्वत: आधीच अनेक कायदेशीर प्रकरणं सांभाळत आहे. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, सलमानने तिला आधीच सुकेशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, पण तिने त्याचं ऐकलं नाही. आणि जॅकलिनने आपला चांगला मैत्री गमावली

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिचं नातं विशेष चर्चेत आलं होतं. याशिवाय तिनं केलेल्या पैशांच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिनची सातत्यानं ईडीकडून चौकशी केली जात होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुकेश आणि जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होते. जॅकलिनबरोबरच नोरा फतेही हिची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here