क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

‘या’ देशात दारु पिणाऱ्यांना फाशीची शिक्षा, विक्री करणाऱ्यांना चाबकाचे फटके


जगभरात दारुचे. अनेक शौकीन आहेत. अमेरिका, युरोप सारख्या देशांमध्ये दारुशिवाय कोणतीही पार्टी किंवा सेलिब्रेशन पूर्ण होत नाही. अनेक देशांमध्ये दारु ही मजा-मस्ती, चैनीची गोष्ट समजभारतातही अनेक दारुचे अनेक शौकीन आहेत. भारतासह काही देशांमध्ये दारुचे सेवन करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. पण काही देशांमध्ये दारु बंदी लागू आहे. एका देशात तर दारू प्यायल्यास तुम्हाला फाशीची शिक्षा होईल. हो हे खरं आहे. भारताच्या शेजारील एक देशामध्ये हा नियम लागू आहे. या देशात दारु पिण्यावर आणि दारू विक्री पूर्णपणे बेकायदेशीरली जाते.भारताशेजारील या देशात दारुबाबत फार नकारात्मक दृष्टीकोन आहे. या देशामध्ये अल्कोहोल उत्पादन, विक्री, साठा किंवा सेवन करणे हे कायद्याचं उल्लंघन आहे. या देशात असं करणं बेकायदेशीर मानलं जातं. कुणी व्यक्ती दारु पिताना किंवा विक्री करताना आढळल्यास त्याला दंड भरावा लागतो किंवा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. इतकंच नाही तर, तुम्हाला फाशीची शिक्षाही होऊ शकते. दारु विरोधात इतके कठोर नियम असलेला देश आहे इराण.’या’ देशात दारु पिणाऱ्यांना फाशीची शिक्षा

 

भारताशेजारील देश इराणमध्ये दारुसंदर्भात फार कडक नियम आहेत. इराणमध्ये कुणीही दारुचं सेवन करताना किंवा आणताना पकडलं गेल्यास त्याला दंड भरावा लागेल. इतकंच नाही तर दारु संबंधित गुन्हासाठी संबंधित व्यक्तीला तुरुंगवास आणि फाशीची शिक्षाही होऊ शकते. दारु विक्री करण्याऱ्यावरही येथे कठोर कारवाई करण्यात येते. इराणमध्ये दारु विक्री करताना आढळल्यास 80 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा देण्यात येते.

 

दारु विक्री करणाऱ्यांना चाबकाचे फटके

 

इराणमध्ये दारु पिण्यास कायदेशीर मान्यता नाही. येथे कोणत्याही वयाची व्यक्ती दारु पिताना आढळल्यासा त्याचावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे हा नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा भोगावी लागते मग ती, व्यक्ती अल्पवयीन असो किंवा प्रौढ. याशिवाय, जर एखादी व्यक्ती वारंवार दारु संबंधित गुन्ह्यांमध्ये दोष आढळल्यास त्या व्यक्तीला फाशीची शिक्षाही होऊ श

 

इराण हे मुस्लिम बहुसंख्य देश आहे. मुस्लिम धर्मात अल्कोहोलयुक्त पेये तयार करणे आणि सेवन करणे या दोन्ही गोष्टींना सक्त मनाई आहे. हा नियम या देशातील नागरिकांसह पर्यटकांसाठीही लागू आहे.

 

इराणमधील दारुबंदीचा नियम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही लागू आहे. इराणमध्ये दारुबंदीच्या कायद्याचे पालन पर्यटकांनाही करावं लागतं, नाहीतर त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता असते. इराणमध्ये क्लब किंवा बार नाहीत. तुम्ही बाहेरून येतानाही दारुसोबत आणू शकत नाही. येथे येणाऱ्या पर्यटकांची विमानतळावर तपासणी केली जाते. त्यामुळे तुम्ही दोषी आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल

 

इराणमध्ये दारुबंदी असली तरी, येथील तरुणांना दारुचं व्यसन आहे. येथील तरुण बेकायदेशीर मार्गाने दारुचं सेवन आणि विक्री करतात. काही ठिकाणी बेकायदेशीररित्या दारु तयार केली जाते. इराणमध्ये बाहेरील देशातून दारुची तस्करीही केली जाते. अनेक वेळा येथील तरुणांचा विषारी दारु सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर येतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *