क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

मटका सुरू होण्यात कोणी बजावली भूमिका


कळंब तालुका काही वर्षांपासून अवैध धंद्यांचे माहेरघर झाले असून तालुक्यात वाढणार्‍या अवैध धंद्याला वैतागून कळंब शहरवासींनी यापूर्वी दोन ठाणेदारांना कळंबातून बदली करून बाहेर पाठविले याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी कळंब येथे परिविक्षाधीन अधिकारी दिनेश बैसाणे यांची काही दिवसांकरिता ठाणेदारपदी नेमणूक केली. त्यांनीसुद्धा कळंब शहरामध्ये होत असलेल्या अवैध व्यवसायांचा आपल्या परीने पूर्ण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. कळंब शहरातून दिवसाढवळ्या होणारी अवैध गोवंश वाहतूक, रेती तस्करी, गौण खनिज व तस्करी  business मटका व्यवसाय याला गेल्या दोन महिने कुलूपबंद केले होते. पोलिस प्रशासनातील शुक’ाचार्यांनी मात्र पुन्हा कळंबमधील मटका अधिकृतपणे सुरू केल्याचे चित्र कळंब बसस्थानकावर पुन्हा दिसू लागले आहे.

 

ठाणेदार दिनेश बैसाने कळंब तालुक्यातील अवैध व्यवसायांवर चाप लावण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या आधीन असलेले कर्मचारी मात्र अवैध धंदे कसे फुलतील आणि आपले खिसे कसे भरतील, याचाच आटोकाट प्रयत्न करीत आहेत. कळंब येथील मटकाकिंग कोणाचा तरी काका कित्येक दिवसांपासून अस्वस्थ होता. या अस्वस्थेची पोलिस प्रशासनाने दखल घेतली आणि त्यांचा व्यवसाय पूर्ववत सुरू करण्याची जणू अघोषित परवानगी दिली. तो परवाना घेऊन त्यांनी आपल्या पंटरच्या माध्यमातून कळंब येथ   मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे चित्र आज कळंबला पाहावयास मिळाले. कळंब शहरात सुरू झालेल्या या मटक्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले असून कदाचित वरपर्यंत अर्थपूर्ण व्यवहार तर झाले नाहीत अशी चर्चा जनमानसात सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान ठाणेदारांचीही गोची होत असल्याचे जाणवत आहे.

 

 

 

कळंब शहरात मटका सुरू झाल्याची माहिती मला मिळताच मी शिपाई पाठवून तत्काळ कारवाई केली व एका आरोपीस अटक केली, असल्याचे ठाणेदार दिनेश बैसाणे यांनी तरुण भारतला सांगितले.आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *