ताज्या बातम्यामहत्वाचे

महाराष्ट्राआधी कर्नाटकचाही सर्व्हे, त्या संस्थेचे आकडे खरे ठरले होते का खोटे?


मुंबई, 19 जून : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकींना अजून जवळपास सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, त्याआधी वेगवेगळ्या संस्थांकडून सर्व्हे केले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर नेमकी काय परिस्थिती असेल?

याबाबतचं सर्वेक्षण न्यूज एरिना इंडिया या संस्थेने केलं आहे. या संस्थेच्या सर्व्हेनुसार भाजपला 123 ते 129 जागा, राष्ट्रवादीला 55-56, काँग्रेसला 50-53, शिवसेनेला 25 आणि ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच काँग्रेस स्वबळावर लढली तर त्यांना 28 जागा मिळतील, असा अंदाज मांडण्यात आला आहे. एवढच नाही तर या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के पसंती देण्यात आली आहेत. तर अशोक चव्हाण यांना 21 टक्के, अजित पवार यांना 21 टक्के, एकनाथ शिंदे यांना 12 टक्के, उद्धव ठाकरे यांना 9 टक्के आणि इतरांना 9 टक्के पसंती देण्यात आली आहे. कर्नाटकचाही सर्व्हे या संस्थेने याआधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारी महिन्यातही सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 113, भाजपला 96 आणि जेडीएसला 15 जागा देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला 135, भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागा मिळाल्या होत्या. सर्व्हेनुसार विभागवार निकाल

कोकण विभाग भाजप- 29 ते 33 शिवसेना- 11 ठाकरे गट- 14 ते 16 काँग्रेस- 5 ते 6 राष्ट्रवादी- 7-8 अपक्ष- 5 मुंबई विभाग (एकूण जागा 36) भाजप- 16 ते 18 शिवसेना- 2 ठाकरे गट- 9 ते 10 काँग्रेस- 5 ते 6 राष्ट्रवादी- 1 अपक्ष- 1 पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 58) भाजप 22 ते 23 शिवसेना- 1 राष्ट्रवादी- 23 काँग्रेस- 9 ते 10 ठाकरे गट- 1 अपक्ष- 1 मराठवाडा (एकूण जागा 46) भाजप 19 शिवसेना 5 राष्ट्रवादी 9 काँग्रेस 10 ठाकरे गट 2 अपक्ष 1 उत्तर महाराष्ट्र/ खान्देश (एकूण जागा 47) भाजप 23 शिवसेना 3 राष्ट्रवादी 14 काँग्रेस 6 ठाकरे गट 0 अपक्ष 1 विदर्भ ( एकूण जागा 62) भाजप 30 ते 31 शिवसेना 5 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 20 ते 21 ठाकरे 0 अपक्ष 4


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *