25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

बदाम भिजवून का खावे?

- Advertisement -

बदामामध्ये आरोग्यास पोषकघटकांचा समावेश असल्यानं डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. चवीसह पौष्टिक गुणधर्मांचा साठा असल्यानं लोक हा सुकामेवा आवडीन खातात. पण सुके की भिजवलेले बदाम खावावे, यावरून लोकांच्या मनात कायम गोंधळ असतो. कोणत्याही स्वरुपात बदाम खाल्ल्यानं शरीराला अधिक फायदे होतील, असा प्रश्न तुमच्याही मनात आहे का? जाणून घेऊया याबाबतची माहिती
​बदाम भिजवून का खावे? काही जण रात्रभर पाण्यामध्ये बदाम भिजवून ठेवतात. पण तुम्ही ५ ते ६ तासांसाठी बदाम भिजत ठेवू शकता. सुक्या बदामाच्या तुलनेत भिजवलेले बदाम आरोग्यासाठी जास्त पोषक असतात. कारण भिजवलेले बदाम पचनास हलके असतात. भिजवलेल्या बदामांमुळे शरीराला जास्त प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. शिवाय, बदाम कधीही सालीसकट खाऊ नये. कारण यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. दिवसभरात तुम्ही आठ ते दहा बदाम खाऊ शकता. सुक्या बदमांच्या तुलनेत भिजवलेले बदाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करतात. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. बदाम हे आरोग्यासाठी सर्वात पोषक आणि उत्तम आहार आहे. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. बदामातील गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, व्हिटॅमिन बी, खनिज, प्रोटीन हे घटक बदामामध्ये असतात. हृदय आणि मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे (Benefits Of Almonds In Marathi) सेवन करावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी कमी होण्यास मदत मिळते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.चयापयचाची प्रक्रिया सुरळीत सुरू होते. यामुळे हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन हृदयविकारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. बदामामुळे ट्रायग्लिसराइडचा स्तर देखील कमी होण्यात मदत मिळते. हृदयरोगी, मधुमेहींसाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे. भिजवलेल्या बदामामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ अँटी-ऑक्सिडेंटच्या स्वरुपात कार्य करते. बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. दैनंदिन आहारात एकाचवेळी भरपूर बदाम खायचे नाहीत. दोन जेवणांच्या वेळामध्ये बदामाचा आहारात समावेश केला तर भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी तयार होत नाही. कोणत्याही पदार्थाचे योग्य मात्रेत सेवन केल तर त्याचे फायदे मिळतात. आवश्यकतेहून अधिक प्रमाणात एखादी गोष्ट खाल्ली तर आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. भिजवलेल्या बदामांच्या सालीमध्ये टॅनिन असतं, जे पोषक तत्त्व शोषून घेताना अडथळा निर्माण करतात. यामुळे भिजवलेले बदाम सालीसकट खाणे टाळावे. तसंच भिजवलेले बदाम खाण्यास आणि पचनास हलके असतात. बदामात पेशी, स्नायू, हाडांना आवश्यक असलेले कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे धातूदेखील असतात. आपल्या डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारांसह अन्य गंभीर स्वरूपाचे आजार दूर राहण्यास मदत होते. मुरुम, त्यांचे डाग, सुरकुत्या इत्यादी त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर करता. पण यामुळे फायदा होण्याऐवजी दुष्परिणामच अधिक होतात. याऐवजी नैसर्गिक औषधोपचार पद्धतींचा मार्ग स्वीकारणे केव्हाही उत्तम. कारण यामुळे आपल्या त्वचेला दीर्घ काळ टिकणारे लाभ मिळतात. तुम्ही नियमित बदामाचे सेवन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. शिवाय त्वचाविकारांपासून तुमची मुक्तता होईल.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles