ताज्या बातम्या

अशाप्रकारे काजू खाल्याने तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल, जाणून घ्या काजू खाण्याची योग्य पद्धत

काजू हे सगळ्यांनाच खायला आवडतात. सगळ्या ड्रायफ्रुट्समध्ये काजू हा बहुत लोकांचा अवडीचा पदार्थ आहे. सुकं खाण्यासोबतच लोक याची भाजी देखील बनवतात किंवा याला इतर भाज्यांमध्ये त्याची चव वाढवण्यासाठी वापर करतात. काजूमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण देतात. काजूमध्ये पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदय निरोगी ठेवतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु काजू काही लोकांसाठी पचायला सोपे नसतात, अशा परिस्थितीत भिजवलेले काजू खाल्याने ते सहज पचवता येतात, ज्यामुळे पोटाची कोणतीही तक्रार उद्भवत नाही.

तसेच तज्ज्ञांच्यामते भिजवलेल्या काजूमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. काजू MUFAs (मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्) ने समृद्ध असतात, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे सेवन आपल्या हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. पुरुषांच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.

चलातर मग जाणून घेऊया भिजवलेले काजू खाण्याचे फायदे

1. फायटिक ऍसिड कमी करते

काजूमध्ये फायटिक अॅसिड असते, जे पचायला सोपे नसते, अशा स्थितीत तुम्ही काजू भिजवून खाल्ल्यास त्यातून फायटिक अॅसिड बाहेर पडते आणि ते सहज पचायला सोपे जाते. फायटिक ऍसिडमुळे काहीवेळा पोटाचा त्रास होतो. काही लोकांना त्याची ऍलर्जी देखील असते. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही भिजवलेले काजू खाऊ शकता.

2. काजू पोषकतत्त्वे वाढवण्यासाठी उपयुक्त
काजूमध्ये आढळणारे फायटिक अॅसिड शरीरातील खनिजांचे शोषण रोखते. त्यामुळे शरीरात काही खनिजांची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत भिजवलेले काजू खाल्ल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. जेव्हा तुम्ही भिजवलेले काजू खातात, तेव्हा ते फायटिक ऍसिडचे तुकडे करतात आणि लोह, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारख्या खनिजांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यासाठी शरीरातील प्रमाण वाढवते.

3. वजन कमी करण्यात उपयुक्त

भिजवलेल्या काजूमध्ये भरपूर कॅलरी, प्रोटीन आणि फायबर असतात ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याच वेळी, त्यातील फायबर चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

4. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

जेव्हा तुम्ही भिजवलेले काजू खातात तेव्हा ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरते. काजू शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) सुधारण्यास मदत करते.

5. काजू हे मेंदूला चालना देणारे आहे:- भिजवलेले काजू मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूचे कार्य वाढवण्यास आणि तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.

6. पुरुषांसाठी काजू खाण्याचे फायदे

पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काजू उपयुक्त ठरू शकतात, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात, जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीमुळे होते. त्यामुळे काजूचे सेवन पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *