ताज्या बातम्या

आवळ्याचे उपयोग


हे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्यारंगाचे अत्यंत औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो.

आवळा हा एक फळ देणारा वृक्ष आहे. हा २० फूट ते २५ फुटापर्यंत उंच वाढतो. आशियाव्यतिरिक्त युरोपात व आफ्रिकेतही आढळतो. आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने मिळतात. आवळ्याचे फूल घंटेच्या आकाराचे असते. झाडाची साल राखाडी रंगाची, पाने चिंचेच्या पानांसारखी, परंतु थोडी मोठी, फुले छोटी व पिवळ्या रंगाची असतात. फुलांच्या जागी गोल, चमकणारे, पिकल्यावर लाल रंगाचे होणारे आवळ्याचे फळ लागते. वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात.

आयुर्वेदानुसार हरीतकी (हड़) आणि आवळा दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. या दोघांमध्ये आवळ्याला जास्त महत्त्व आहे. चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबवणाऱ्या अवस्थास्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *