क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हा

बीडमध्ये बेवारस गोणीत आढळला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा


शहरातील पेठ भागातील शहेनशाहवली दर्गा भागातील सार्वजनिक शौचालय परिसरात अनोळखी व्यक्तीकडून एका प्लॅस्टिक गोणीत बेवारस फेकलेल्या जवळपास साडेसहा हजार रूपयांच्या कफ सिरपच्या ५३ बाटल्या पेठ बीड पोलिसांनी ९ एप्रिल रोजी जप्त केल्या.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

याप्रकरणी १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहेनशाहवली दर्गा परिसरात सार्वजनिक शौचालय परिसरात ९ एप्रिल रोजी अनोळखी व्यक्तीकडून बेवारस अवस्थेत फेकलेली प्लॅस्टिक गोणी पेठबीड पोलिसांनी हस्तगत केली. यात एकूण शंभर मिलीलिटरच्या ५३ औषधी बाटल्या (कफ सिरप) हस्तगत केल्या होत्या. फौजदार जाधव, पोलिस कर्मचारी कलीम इनामदार, पाटोळे, सानप यांनी ही कारवाई केली होती. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळविल्यानंतर औषध निरीक्षक दुसाने यांनी सदर औषध नमुना घेतला. त्यानंतर उर्वरित ४९ बाटल्यांचा साठा पेठबीड पोलिसांनी ११ एप्रिल रोजी पंचनामा करून जप्त केला. याप्रकरणी औषध निरीक्षक दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ३२८ ,२७६ भादंवि, एनडीपीएस ८(सी),२२(ए) ,व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १८(सी) चा भंग केल्याच्या आरोपावरून बेवारस व्यक्तीविरुद्ध १२ एप्रिल रोजी पेठबीड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी
जप्त केलेल्या साठ्यातील कफ सिरपच्या बाटल्यांतील नुमने छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणी आणि विश्लेषणासाठी पाठविण्यात आल्या असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

औषध कंपनीकडून डिटेल्स मागविले
जप्त केलेल्या बाटल्यांवरील कंपनीच्या लेबलनुसार औषध निरीक्षक दुसाने यांनी संबंधित उत्पादक कंपनी व मार्केटिंग कंपनीला पत्र पाठवून बॅच नंबरनुसार भारतात कोठे औषध विक्री झाली, याो डिटेल्स मागविले आहेत.

विक्रेता, नशेखोर मोकाट
शहेनशाहवली दर्गा परिसरात सापडलेल्या गोणीत ५३ बाटल्या प्रिमियम कफ सिरपच्या असल्याचे आढळले. खोकल्यासठीच्या या औषधांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यातच ९ एप्रिल रोजी औषधी बाटल्यांचा साठा सापडल्याने कारवाई टाळण्यासाठी विक्रेता अथवा नशेखोरांनी ती बेवारस फेकली असावी, असा संशय आहे. विक्रेता आणि नशेखोर अद्याप मोकाट आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *