अहमदनगरताज्या बातम्या

सार्वजनिक रहदारीला अडथळा; तीन वाहन चालकावर गुन्हे दाखल

 अहमदनगर : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सुदेश चौक परिसरात सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहनचालकावर पोलिसांनी सोमवारी (दि.१०) रात्री कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे.

या प्रकरणी विष्णु दत्तु दिवटे ( वय ३८, रा. खिर्डी गणेश ता. कोपरगाव ) यांचा छोटा हात्ती ( एम. एच-१७ -बी वाय ७५३४), मुर्शरफ बशिर शेख ( वय १९, रा. १०५ हनुमाननगर, कोपरगाव ) यांची दुचाकी एच एफ डिलक्स (एम.एच.१७ बी.जी.१२५०) व संजय भिमराज पठाडे ( वय ४२, रा. आदर्शनगर वार्ड नं १ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि अहमदनगर ) यांची जितो गाडी ( क्र. एम. एच. १७ सी. व्ही. ०५११ ) यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *