परंडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पॅनलचा विजय
माजी आमदार राहुल मोटे यांच्या बाणगंगा शेतकरी विकास पॅनल चा दारून पराभव
उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकत्यांच्या जल्लोष ,
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची मतदारावर पकड कायम ,
परंडा : ( सुरेश बागडे ) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शेतकरी विकास पॅनलने , राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या बाणगंगा शेतकरी विकास पॅनलचा पराभव करीत विजय मिळविला आहे .
विजया ची घोषणा होताच ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला ,
परंडा विविध कार्यकारी सोसायटी च्या १३ जागे साठी रविवार दिनांक २६ फेब्रुवारी जिल्हा परिषद कन्या शाळेत मतदान घेण्यात आले ,
४ वाजता मतदान संपल्या नंतर मतमोजणी करण्यात आली
विविध कार्यकारी सोसायटी च्या सर्वसाधारण खातेदार विभागातून उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार अशोक खैरे , कालीदास खैरे , लक्ष्मण गरड , विनोद गावडे ,अब्दुल पटेल , खलीलखॉ पठाण , अनिल शिंदे , लक्ष्मण होरे, हे उमेदवारांनी जवळपास ३०० मतांची अघाडी घेऊन विजयी झाले ,
तर महिला राखीव मतदार संघातून उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या
गंगूबाई राजेश गायकवाड यांनी
२३७ तर झुंबरबाई मधूकर जाधव , यांनी १९४ मतांची अघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत .
तर इतर मागास वर्गीय मतदार संघातून मैनुद्दीन तुटके ,यांनी २२६ मतांची अघाडी घेऊन विजयी झाले आहेत ,
तर भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून सुधाकर गायकवाड यांनी २८१ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे .
तर अनुसुचित जाती जमाती मतदार संघातून नाना शिंदे यांनी २३९ मतांची अघाडी घेऊन विजयी झाले आहेत .
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा पॅनल विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला ,
यावेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके , तालूका प्रमुख मेघराज पाटील , रणजित पाटील , आब्बास मुजावर , रईस मुजावर , इरफान शेख , मकरंद जोशी , बुध्दीवान लटके , संतोष गायकवाड , प्रशांत गायकवाड , अंकुश डांगे , बुध्दीवान गोडगे, दिपक गायकवाड , किरण शिंदे , समीर पठाण एस के , कुनाल जाधव , तुकाराम गायकवाड , लतीफ कुरेशी , आझहर शेख , तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते सचिन गायकवाड , विजय जाधव , दादा काळे , किरण काकडे , अंकुश व्होरे, अनिल काकडे , दादा व्होरे , समाधान व्होरे , विशाल शिंदे , तानाजी व्होरे, विनोद काकडे , इंद्राजित व्होरे, रूपेश काळे , सुधिर काळे , महारूद्र खबाले यांच्या सह शेकडो कार्यकर्तेनी आनंदोत्सव साजरा केला .