12.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

सार्वजनिक शिवजयंती जातेगाव ला द्वितीय क्रमांक बक्षीस देऊन तलवाडा पोलीस कडुन सन्मान

- Advertisement -

सार्वजनिक शिवजयंती जातेगाव ला द्वितीय क्रमांक बक्षीस देऊन तलवाडा पोलीस कडुन सन्मान

- Advertisement -

महापुरुषांची जयंती नाचुन नाहीतर पुस्तके वाचून साजरी करावी डी वाय एसपी स्वप्निल राठोड

- Advertisement -

तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरजी वाघमोडे यांचा स्तुत्य उपक्रम

गेवराई : महापुरुषांच्या जयंती नाचुन न करता पुस्तके वाचून साजरी करावी असे आवाहन डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी शिवजयंती उत्सव शांततेच्या मार्गाने आणि सामाजिक आदर्शदायी शिवजयंती साजरी करणाऱ्या गावकऱ्यांच्या सत्कार प्रसंगी तलवाडा पोलीस स्टेशनच्या आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले आहे

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर जी वाघमारे साहेब यांनी स्तुत्य उपक्रम राबवला असून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ज्या गावकऱ्यांनी आदर्शदायी उपक्रम राबवत शांततेच्या मार्गाने डीजे मुक्त शिवजयंती साजरी केली अशा समितीला बक्षीस देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी शिवजयंती आदर्श उपक्रमात तलवाडा शिवजयंती उत्सव समितीला प्रथम पारितोषिक तर द्वितीय क्रमांक जातेगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला मिळाला असून तृतीय क्रमांक गोविंदवाडी शिवजयंती उत्सव समितीला तर उत्तेजनार्थ जय अंबिका शंकर पट तलवाडा यांना मिळाला व तसेच गंगावाडी शिवजयंती उत्सव समितीलाही उत्तेजनार्थ सत्कार करण्यात आला याप्रसंगी डीवायएसपी स्वप्निल राठोड म्हणाले की गावकऱ्यांनी प्रत्येक महापुरुषाच्या जयंती नाचून नाहीतर पुस्तके वाचून साजरी करावी आणि शांततेच्या मार्गाने सर्व समाज बांधवांना एकत्रित करून सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम उपक्रम राबवले तर महापुरुषांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल याप्रसंगी तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर जी वाघमोडे साहेब यांनीही गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या परिसरातील गावा गावात महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त जे गाव सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून आदर्शदायी शांततेच्या मार्गाने कार्यक्रम करेल अशांना समितीला प्रोत्साहन पर दरवर्षी सन्मान सत्कार करून बक्षीस दिले जातील जेणेकरून महापुरुषाच्या जयंतीनिमित्त महापुरुषांचे विचार समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचतील असेही पोलीस निरीक्षक शंकर जी वाघमोडे म्हणाले, यावेळी उपस्थित सरपंच विष्णू हत्ते,मा जि प सदस्य युवराज तात्या डोंगरे, मा जि प सदस्य सुरेशराव हात्ते , मा प स सदस्य श्याम आबा कुंड, मा सभापती गीतारामजी डोंगरे, डॉ मराठे, सरपंच बंडू नाना पवार, सरपंच रवींद्र बप्पा गाडे, गोरख चव्हाण, गोपाल भैय्या चव्हाण, दत्ता भाऊ वाघमारे, शिवाजी नाना चव्हाण, पत्रकार सुभाष शिंदे, सुमित कर्डे, तुळशीराम वाघमारे, विष्णू राठोड, अल्ताफ कुरेशी, गांधले, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब यांनी केले, नागरगोजे खंडागळे, सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

- Advertisement -

Related Articles

Latest Articles