मुख्यमंत्री .श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण मित्र फांऊडेशन कडुन बीड येथे गोरगरिबांना अन्नदान.


मुख्यमंत्री .श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण मित्र फांऊडेशन कडुन बीड येथे गोरगरिबांना अन्नदान.

बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णू मित्र फाउंडेशन बीड यांच्या माध्यमातून बीड शहरातील निराधार व बेघर असणारे जिव्हाळा अनाथ बेघर केंद्रात समस्त गोरगरीब अंध-अपंग, व लहान मुले, महिला बांधवांना अन्नदान रुग्ण मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांच्या व सर्व सामाजिक कार्यकर्ते व सदस्य पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या अन्नदाचा अनेक गोरगरीब बेवारस अनाथ अंध अपंग व्यक्तींनी लाभ घेता आला. या अन्नदान कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी रुग्ण मित्र फांऊडेशन मार्फत सदिच्छा शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रुग्णू मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे जिव्हाळा निराधार केंद्राचे वंजारे सर, बीड शहर अध्यक्ष विनोद चांदणे, जनसंपर्क अधिकारी डॉ, रविकीरण गिरी सर, डॉ मारोती नांदे, सागर राऊत, महेश कसबे, जोगदंड सर, शिंदे आदी समाजसेवक व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here