राहुरी महाविद्यालयाच्या सौ.गौरी सत्यजीत कराळे -तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक

राहुरी महाविद्यालयाच्या सौ.गौरी सत्यजीत कराळे -तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक

राहुरी- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए पदव्युत्तर कला शाखेच्या परीक्षेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील गौरी सत्यजीत कराळे-तनपुरे हिस “श्रीमती नलिनी ठक्कर सुवर्णपदक”प्राप्त झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे यांनी दिली. ते म्हणाले की,आपल्या महाविद्यालयातील गौरी हिचे यश हे सर्वांना दिशादर्शक असून यातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व आपल्या महाविद्यालयाची यशाची परंपरा अशीच सुरु राहिल. हे मिळालेले सुवर्णपदक महाविद्यालय व संस्थेच्यादृष्टीने अत्यंत गौरवास्पद म्हणावे लागेल. महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले. सुवर्णपदकांची मालिका खंडित न होता कायम राहिली याबद्द्ल प्राचार्य संभाजी पठारे यांनी समाधान व्यक्त केले.
गौरी ही शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांची कन्या व कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर चे अध्यक्ष ॲड शिवाजी आण्णा कराळे पाटील यांची स्नुषा आहे. यावेळी शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी आपल्या कन्येच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, विद्यार्थ्याना यशाची सप्त सूत्रे सांगून, अमुल्य असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयातर्फे सुवर्णपदकांच्या मानकरी ठरलेल्या सौ.गौरी सत्यजीत कराळे- तनपुरे व शिवशाहीर तनपुरे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना, महाविद्यालयातील उपलब्ध सोयीसुविधांमुळे व राज्यशास्त्र विभागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मला या परीक्षेत यश संपादन करता आले व त्यामुळेच हे सुवर्णपदक प्राप्त झाले असल्याचे सौ. गौरी कराळे- तनपुरे हीने महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.
प्राचार्यांचे अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिरुद्ध जाधव तर सूत्रसंचालन प्रा.प्रतिक्षा देशमुख तर आभार ग्रंथपाल प्रा. संदीप मगर यांनी मानले. यावेळी कार्यालय अधिक्षक श्री विठ्ठल लांबे, प्रा. शिवजी हुलुळे,प्रा. पंकज घोलप, प्रा. रंगनाथ खिलारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव ढोकणे पाटील, उपाध्यक्ष श्री सुरसिंगराव पवार, जनरलसेक्रेटरी श्री महेश पाटील व सर्व सन्मानीय संचालक मंडळ, संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. ए. बी.पारखे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांनी अभिनंदन केले.

👏🏻👏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here