ताज्या बातम्या

भूकंपात १६२१ जणांचा मृत्यू; दिवसभरात बसले दोन धक्के


तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकपांत आतापर्यंत १ हजार ६२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो नागिरक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी पहाटे हा भूंकप झाला.

त्याची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. त्यानंतर दुपारीही या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी दक्षिण तुर्की झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्की व सीरियाला भारताकडून मदतही पाठवली जाणार आहे.

सोमवारची पहाट तुर्की व सीरियासाठी शोक संदेशच घेऊन आली. सकाळी ७.९ रिश्टर स्केलच्या भूकपांने ही दोन्ही शहरे हादरली. भूकंपाची तीव्रता एवढी होती ही या दोन्ही देशातील इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले. काहींची घरे जमीनदोस्त झाली. पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. तुर्कस्तानच्या गाझियानटेप येथे हा भूंकप झाला. गाझियानटेप हे भूकंपाचे केंद्रस्थान असल्याने आसपासच्या परिसरात मोठी हानी झाली. त्यानंतर दुपारी पुन्हा दक्षिण तुर्की परिसरात भूकंपाचे धक्के बसले. ७.६ रिश्टर स्केल एवढी भूंकपाची तीव्रता होती.

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अनेक इमारती कोसळल्याचे दिसत आहे. नागरिक भयभीत होऊन आक्रोश करताना दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली हजारो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरु झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तुर्की व सीरियाला सर्वोत्तोपरी मदत करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले आहे. त्यानंतर सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी तातडीची बैठक बोलवली. तुर्की आणि सीरियाला मदत पाठवण्यावर बैठकीत चर्चा झाली. भारताचे एनडीआरएफ व बचाव पथक तुर्की व सीरियाला पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही तुकडीत शंभर जवान असतील. औषधे, डॉक्टर व अन्य साहित्यही भूंकप झालेल्या ठिकाणी पाठवले जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *