रामदेव बाबानं सांगितलं नखाला नखं घास, मी पण केलं, पण माझे सगळे केस गेले. नवीन केस यायचं नावच नाही – अजित पवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या मिश्किल आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आत्ताही त्यांनी असंच एक विधान केलं आहे, ज्यामुळे सभेत हशा पिकला आहे.

यावेळी त्यांनी रामदेव बाबांचा उल्लेख करत आपल्या केसांवर विनोद केला आहे.

अहमदनगर इथल्या शेतकरी मेळाव्यामध्ये रामदेव बाबा बोलत होते. यावेळी त्यांनी बुवाबाजीवरही भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “तुम्ही नखावर नखं कशाला घासता? रामदेव बाबांनी सांगितलं म्हणून.

रामदेव बाबानं सांगितलं नखाला नखं घास, मी पण केलं, पण माझे सगळे केस गेले. नवीन केस यायचं नावच नाही. या बुवा लोकांचं काय ऐकू नका. “

“साधूसंतांचं, महापुरुषांचं ऐका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद, शाहू-फुले-आंबेडकर किंवा अण्णा भाऊ साठे या सगळ्या महान लोकांचे विचार ऐका.

पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं. डॉक्टरकडे जावं लागेल. डॉक्टर म्हणेल हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here