ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड जिल्हा शल्यचिकित्सकांकडून गेटवरच हजेरी अन लेट कर्मचाऱ्यांची..


जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून लहान- मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी अनेक वेळा कडक भूमिका घेतली अन लेट लतीफ कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली


बीड : आज (सोमवार) सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच किती कर्मचारी उशिरा येतात याची नोंद घेत नऊ ते साडेदहा पर्यंत सर्च ऑपरेशन राबवले. यामध्ये तब्बल 145 कर्मचारी उशिरा येत असल्याचे पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी वेळेवर येणे अपेक्षित आहे, मात्र दहा-साडेदहा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची येजा सुरूच होती. उशिरा येणाऱ्या तब्बल 145 कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिले आहेत.

यामध्ये दोन्ही आर एम ओ, डॉ. संतोष शहाणे, डॉ. राम आव्हाड यांच्यासह डॉक्टर, नर्स, कार्यालयीन कर्मचारी व आरोग्य सेवेतील कर्मचारी यांची उशिरा येण्याची नोंद झाली.

आज (सोमवारी) सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या गेटवरच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची डॉ.सुरेश साबळे यांनी हजेरी घेतली. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र यामुळे तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आधीसेविका मेट्रन रमा गिरी यांची उपस्थिती होती.

मुख्य गेटवर कारवाई सुरू असल्याने दुसरे गेट बंद करण्यात आले होते. मात्र काही कर्मचाऱ्यांनी आपली गाडी बाहेर पार्क करत भिंतीवरून उडी मारून आत मध्ये येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची देखील उशिरा आल्याची नोंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून असा हलगर्जीपणा केला जात असेल, तर यापुढे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *