शिक्षक क्लासरूममध्येच विद्यार्थिनीसोबत संबंध ठेवताना पकडला गेला, अन..


एक शिक्षक त्याच्या विद्यार्थिनीसोबत रोमान्स करत असताना त्याला पकडण्यात आलं. पण कहाणी इथेच थांबली नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दोघांनी असं काही केलं जे व्हायरल झालं.

ही घटना अमेरिकेच्या अलबामामधील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना काही दिवसांआधीची आहे. येथील एका शाळेत 19 वर्षीय एक विद्यार्थिनीचं शिक्षकासोबत अफेअर सुरू होतं. याची खबर ना स्कूल प्रशासनाला होती ना तिच्या घरातील लोकांना. एक दिवस असं काही झालं की, सगळेच हैराण झाले. या दोघांना क्लासरूममध्ये शारीरिक संबंध ठेवताना बघण्यात आलं.

यानंतर शिक्षकाला लगेच निलंबित करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. काही दिवसांनी जेव्हा शिक्षक बाहेर आला तेव्हा कोर्टाने आदेश दिला की, हे दोघे आता कधी एकमेकांना भेटणार नाहीत. पण जसा शिक्षक बाहेर आला त्याने सगळ्यांना धक्का देत विद्यार्थिनीसोबत लग्न केलं. जिच्या नादात तो तुरूंगात गेला होता.

मुलगीही यासाठी तयार होती. असं सांगितलं जातं आहे की, तुरूंगातून बाहेर येताच दोघांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आणि दोघांनी लग्न केलं. पण त्यांच्यावर कोर्टाचा एक आदेश होता. ज्यात तुरूंगातून बाहेर येताना कोर्टाने सांगितलं होतं की, हे दोघे एकमेकांना भेटू शकत नाहीत. लग्नानंतर दोघांनी कोर्टाकडे मागणी केली की, त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here