10.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या – शेख शफीक भाऊ

- Advertisement -

सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या – शेख शफीक भाऊ

- Advertisement -

बीड (प्रतिनिधी) :- समाजासाठी विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन चे बीड जिल्हाध्यक्ष एड.शेख शफिक भाऊ यांनी व्यक्त केले आहे.
असे की शहरातील खासबाग येथे पठाण आय्यूब खान यांची नात व गजी खान यांची मुलगी जैनब आरा हिच्या दुवाऐ खैर निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात संबोधन करताना एम.आय.एम चे बीड जिल्हाध्यक्ष एड.शेख शफीक भाऊ यांनी समाजासाठी विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत व्यासपीठावरून व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमात खासबाग मस्जिद चे इमाम हाफीज मुख्तार,औरंगाबाद येथील एम.आय.एम चे नगरसेवक अजीम खान, रफीक खान,माझी नगरीचे संपादक पठाण अमरजान व सेव बर्ड मोमेंट चे शेख अमीर मदनी यांच्या हृदय सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खमरुल इमान खान यांनी केले. तर आभार प्रदर्शन गाजी खान यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमात शेख मतीन भैया,अदनान खान सर,खन्ना भैय्या,मोबीन खान,फिरोज खान,उबेद खान,रिशान खान,अमजद खान, हुसेन देशमुख,शेख शाकेर सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles