7.9 C
New York
Thursday, April 18, 2024

Buy now

. तर राजकीय संन्यास घेऊन सीमेवर जाऊन भांडी घासेन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- Advertisement -

मला जेव्हा केव्हा चित्रा वाघ यांच्यासारख्या महिला राजकारणी सांगतील, तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल आणि सीमेवर जाऊन सैनिकांची भांडी घासेन, कपडे धुण्याचे काम करेन, यासाठी मला बायकोचाही पाठिंबा आहे’, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

भाजपच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. त्यावेळी पाटील बोलत होते. आपला देश गुण्यागोविंदाने नांदत होता. मात्र परकीय आक्रमणांमुळे दृष्ट लागल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची थेट महात्मा फुले यांच्याशी तुलना

भाजपतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त ‘सन्मान स्त्र्ााr शक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारीदेखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात जितक्या चळवळी झाल्या, जितकी आंदोलने झाली, त्याचे पेंद्र पुणे राहिले आहे. आजच्या कार्यक्रमात नवीन सुरुवातही येथून झाली आहे. आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध जारी आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles