पेशावरमधील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात 28 जण ठार आणि 143 जखमी

पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात 28 जण ठार आणि 143 जखमी झाले असे सुरक्षा आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी स्थानिक न्यूजने सांगितले आहे.

बॉम्बस्फोटामध्ये मशिदीचा एक भाग पडला असून अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. खैबर-पख्तुन्वा प्रांताच्या राजधानीचं शहर असलेल्या पेशावरमधील पोलीस लाइन परिसरातील मशिदीमध्ये दुपारचं नमाज पठण सुरु असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे. दरम्यांमधे पेशावरमध्ये मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे.

सुरक्षा अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, attack on mosque आत्मघाती हल्लेखोर प्रार्थनेच्या वेळी समोरच्या रांगेत उपस्थित होता. जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्फोटात दोन पोलीस शहीद झाले असून 143 जखमींना सुविधेत आणण्यात आले आहे. अधिक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच मदतकार्य करणाऱ्या टीम आणि सुरक्षा यंत्रणांच्या टीम घटनास्थली दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here