क्राईमताज्या बातम्यामुंबई

पोलिसांच्या सामाजिक सेवा पथकाच्या विशेष कारवाईत 22 महिलांची सुटका

मुंबई : मुंबईतील अंधेरी मध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने कारवाई करत 35 जणांना अटक केली आली असून 22 महिलांची सुटका करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने शनिवारी रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घाटकोपर येथील पंत नगर परिसरातील बारवर छापा टाकला.पोलिसांनी छाप्यादरम्यान 57 हजर रुपये रोख आणि संगणक उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांच्या कारवाईत कमीतकमी 22 महिलांची सुटका करण्यात आली. बार मॅनेजर, कॅशियर, सात वेटर आणि 13 ग्राहकांसह 35 जणांना अटक करण्यात आली.भारतीय दंड संहिता आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार रूममध्ये अश्लील नृत्य करण्यास महाराष्ट्र प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (त्यामध्ये काम करणार्‍या) कायदा 2016 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *