नशा मुक्त भारत अभियान चळवळ गतीमान करणार-डॉ. किरण धवले

नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात डॉ किरण धवले यांचा सत्कार.

नशा मुक्त भारत अभियान चळवळ गतीमान करणार-डॉ. किरण धवले

अंबाजोगाई : व्यसनमुक्ती क्षेत्रात केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करत असलेल्या क्रांती ज्योत बहऊद्देशिय सेवाभावी संस्थेच्या राज्यात विस्तारित शाखा वाढत आहेत तसेच व्यसनमुक्तीसाठी तज्ञ हि संस्थेला लाभत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय अंबाजोगाई या ठिकाणी सध्या नव्याने कार्यरत झालेले डॉ.किरण धवले सर यांनीही व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या ऊद्देशान आपला सेवाभाव संस्थेला दर्शविला म्हणून महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परीषद महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्ष तथा नवजीवनच्या संचालक प्रा.अंजली पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष लातूर (व्यसनमुक्ती सेल) तथा नवजीवन चे संचालक डॉ राजकुमार गवळे यांच्या हस्ते वाघाळा येथे डॉ. किरण धवले यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी विनायक परकाळे प्रकल्प समन्वयक ओम डोलारे,लेखापाल भागवत आव्हाड, गणेश गुजर,संतोष राजपंखे, तुषार सोनवणे,बिपिन कांबळे, कार्यक्रमासाठी उपस्थित होते . अशी माहिती राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते,नवजीवनचे प्रकल्प समन्वयक तथा भारत सरकार नशा मुक्त अभियानचे सदस्य प्रा.आजिनाथ शेरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here