बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 या वर्षात अनेक मोठ्या घटना यावर्षी भयंकर युद्ध आणि सौर त्सुनामी

भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 या वर्षात अनेक मोठ्या घटना घडणार आहेत. हे वर्ष शोकांतिकांनी भरलेले असेल. यासोबतच पृथ्वीच्या कक्षेत अणुहल्ल्यामुळे अनेक बदल देखील होणार आहेत. यासोबतच बाबा वेंगा यांनी यावर्षी भयंकर युद्ध आणि सौर त्सुनामीची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा ही बल्गेरियाची एक महिला भविष्यकार आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. बाबा वेंगा यांनी यापूर्वी 9/11 चा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला यासह अनेक भाकिते केली होती. त्यांची ही भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी 2023 साठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या धोकादायक आहेत
Baba Vanga predictions : तीसरे महायुद्ध आणि परमाणु विस्फोट

बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर 2023 मध्ये अणुऊर्जेचा स्फोट होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल शिवाय पैशाचे देखील नुकसान होणार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या संदर्भात बाबा वेंगाचे भाकीत विश्लेषक पाहत आहेत. विश्लेषकांच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे रूप घेऊ शकते. याशिवाय बाबा वेंगा यांनी असेही म्हटले आहे की, एखादा मोठा देश जैविक शस्त्रांनी हल्ला करू शकतो. यात हजारो लोक मारले जातील.

Baba Vanga predictions : सौर वादळ येणार?

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, सौर वादळ म्हणजे सूर्यापासून निघणाऱ्या ऊर्जेचा स्फोट होऊ शकतो. या स्फोटामुळे अनेक धोकादायक किरणोत्सर्ग पृथ्वीवर पडतील. पृथ्वीसाठी हे अत्यंत घातक ठरू शकते. त्याचा प्रभाव अब्जावधी अणुबॉम्ब सारखा शक्तिशाली असू शकतो. हे सौर वादळ भयंकर विनाश घडवू शकते.

Baba Vanga predictions : प्रयोगशाळेत तयार होणार बाळ

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये बाळांना प्रयोगशाळेत विकसित केले जाईल आणि त्यांच्या त्वचेचा रंग व लिंग त्यांचे पालक ठरवतील. अशा परिस्थितीत बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर आता मानवाकडून मुलांना जन्म देण्याची परंपरा संपुष्टात येऊ शकते.

Baba Vanga predictions : एलियनचा हल्ला होईल

बाबा वेंगांच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे की, 2023 मध्ये पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहावरून येणाऱ्या शक्तींचा हल्ला होऊ शकतो. ज्यात लाखो लोक मारले जातील. विश्लेषक एलियन हल्ल्याचा अंदाज घेत आहेत. या हल्ल्यामुळे लोकांचे आणि पैशाचे खूप नुकसान होऊ शकते.

Baba Vanga predictions : वीज प्लांटमध्ये स्फोट झाल्याने लोकांना गंभीर आजार होणार

बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, वीज प्लांटमधील स्फोटामुळे जगभरात विषारी ढग पसरू शकतात आणि संपूर्ण आशिया खंड अंधारात बुडू शकतो. यामुळे गंभीर आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

Baba Vanga predictions : जैविक शस्त्रांनी हल्ला

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जैविक शस्त्रांनी देशावर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे बळी जातील. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जैविक शस्त्रांच्या वापराबाबत अनेकदा बोलले आहे.

Baba Vanga predictions : अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट

बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2023 मध्ये आशिया खंडातील अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.

वरील सर्व बाबी नवगण न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नवगण न्युज कोणताही दावा करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here