ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहरसंपादकीय

हळूहळू भारत हा कॅन्सरची देखील राजधानी व्हायला निघाला आहे एका घरी कॅन्सर झाला की तो संपूर्ण परिवार उध्वस्त होतो

बीड : दारुने संसार उद्धवस्त होत आहेत. तरुणाई शिक्षणाकडे लक्ष द्यायच्या ऐवजी व्यसनांकडे लक्ष देत आहे. केवळ दारूच नाही. सिगारेट, गुटखा, तंबाखू. अनेक लोकांना वाटते सिगारेट म्हणजे स्टाईल आहे.
हळूहळू भारत हा कॅन्सरची देखील राजधानी व्हायला निघाला आहे. परिवारच्या परिवार उध्वस्त होतात. एका घरी कॅन्सर झाला की तो संपूर्ण परिवार उध्वस्त होतो. म्हणून सगळ्या प्रकारच्या व्यसनाांपासून कसे दूर जाता येईल याचा विचार केला पाहिजे. पान, बिडी, सिगारेट, दारू, तंबाखू, अंमली पदार्थ.कुठल्याच प्रकारचे व्यसन आपल्याला नको. ज्यावेळी आपल्या क्रांतीकारकांना विचारले जायचे की तुम्हाला कुठले व्यसन आहे. ते म्हणायचे, आम्हाला एकच व्यसन आहे ते म्हणजे देशभक्तीचे. आपल्या भारतमातेची,आपल्या समाजाची सेवा करण्याचे व्यसन. हे एकच व्यसन असे आहे की जे आपल्याला असले पाहिजे. बाकी सगळ्या व्यसनांपासून दूर जाणे गरजेचे आहे. असंही त्यांनी सांगितले.
आपण पाहतो की आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान आपल्या सोबत छुपे युद्ध करतो. या छुप्या युद्धाचा भाग म्हणून आपल्या देशात अंमली पदार्थ पाठवून तरुणाईला व्यसनाधीन करायचे. पाकिस्तानच्या लगत असणारे पंजाब राज्यात पाकिस्तानातून इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आले. व्यसनमुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे. एखादा समाज संपवायचा असेल तर त्या समाजातल्या तरुणाईला सुखासीन करा, व्यसनाधीन करा म्हणजे त्या समाजाशी लढाईच करावी लागत नाही. तो समाज आपोआप संपतो. म्हणून समाजाला जर पुन्हा उभे करायचे असेल तर व्यसनापासून दूर आणि सुखासीनतेपासून दूर तरूणाई तयार हवी. कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय विनायकजी मेटे यांनी व्यसनमुक्ती अभियान चालू केले.
स्व. मेटे यांच्या पश्चात श्रीमती ज्योतीताई मेटे यांनी हे अभियान पुढे नेण्याचा विडा उचलला. मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केले. व्यसनाधीन तरुणाई ही दुश्मनाचा मुकाबला कसा करेल ? हा केवळ व्यसनाचा विषय नाही. हा छुप्या युद्धाचा भाग देखील आहे, जिथे आमच्या तरुणाईला सुखासीनतेकडे, व्यसनाधीनतेकडे न्यायचे. त्यांच्या मनातली श्रद्धा कमी करायची. त्यांची दृढता संपुष्टात आणायची अशा प्रकारचे षडयंत्र आहे. याच्या विरोधात आपल्याला लढावेच लागेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून माझ्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना, बालकांना, तरुणांना मी विनंती करणार आहे. आज जी शपथ आपण घेत आहोत ती तुम्ही अंमलात आणा. कदाचित आधीच्या पिढीतील व्यसनाधीनता तुम्ही पाहिली असेल. ती तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका, ही विनंती तुम्हाला करतो. आपल्या सरकारने अंमली पदार्थांच्या विरोधात खूप मोठी मोहिम सुरु केली आहे. 4000 कोटी रुपयांची अंमली पदार्थ जप्त करून आपण जाळून टाकली. व्यसनमुक्तीचे जे कार्य विनायक मेटे यांनी हाती घेतले होते, ते कार्य ज्योतीताई पुढे नेत आहेत. आपण सगळे मिळून या कार्याला व्यापकता कशी येईल, केवळ बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रात असे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळात आपण निश्चित करू. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *